पाळधी येथे हौदात पडून महिलेचा मृत्यू

0

जळगाव । धरणगाव तालुक्यातील पाळधी (ब्रुद्रूक) येथील महिलेचा सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पाणी काढताना तोल जाऊन हौदात पडल्याने बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पाळधी पोलिस दूरक्षेत्रात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाळधी येथील लताबाई महेंद्र कोळी (वय 24) ही महिला सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास हौदात पाणी घेण्यासाठी गेली होती. मात्र यावेळी तिचा पाय घसरल्याने तोल जाऊन ती हौदात पडली. बराचवेळ त्या ठिकाणी कोणीच आले नाही. त्यामुळे पाण्यात बुडून गुदरून तिचा मृत्यू झाला. तिला सोमवारी सकाळी 9.40 वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी आपतकालीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषीत केले. या प्रकरणी पाळधी दूरक्षेत्रात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.