पावसाच्या आगमनाने खरीपाची उर्वरीत पेरणी होणार

0

जळगाव। जिल्ह्यात वर्षात 8 लाख 33 हजार 216 हेक्टरवर एकुण लागवड होण्याची शक्यता कृषी विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. त्यापैकी जिल्ह्यात मान्सुनपुर्व तसेच खरीप हंगामातील 5 लाख 54 हजार 704 हेक्टरवर लागवड झालेली आहे.

यात कापसाची 3 लाख 50 हजार 680 हेक्टरवर कापूस बियाण्याची लागवड करण्यात आलेली आहे. अद्यापही 1 लाख 80 हजार 719 हेक्टरवरील कापूस बियाण्याची लावगड बाकी आहे. 20 दिवस पावसाने अचानक दांडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र पाऊस झाल्याने दुबार पेरणीची शक्यता कमी असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यात विविध बियाण्याची 48288 क्विटल मागणी होती. त्यापैकी 42 हजार 411 क्विटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला असून 27 हजार 432 क्विटल बियाण्याची विक्री झाली आहे.