धुळे। पावसाळ्याची सुरवात झाली आहे.पावसात चालकांनी बस सुरक्षित चालवावी व अपघातात टाळावे, असे आवाहन एस.टी. महामंडळाच्या प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पावसाळ्यांत प्रचलित नियमानुसार अधिक सावध राहून सुरक्षित वाहन चालवावे,वादळी हवेमुळे किंवा अतिवृष्टी तसेच दाट धुक्यामुळे चालकाला रस्ता स्पष्ट दिसत नाही. अशा वेळेस चालकाने वेग मर्यादित ठेवून वाहन चालवावे,पावसाळ्यात पुढे असलेले वाहन अतिवेगात ओलांडू जावू नये, पुलाच्या फरशीवरुन सुरक्षितता पातळीच्या वर पाणी वाहत असेल तर एस.टी.बस पुढे नेवू नये,निसरडे रस्ते असल्यास सुरक्षित अंतर ठेवावे.
वाहनचालकांना प्रशासनातर्फे सूचना
योग्य ती काळजी घेतल्यास अचानक ब्रेक लावून बस घासण्याची शक्यता कमी होते. रस्त्याचा कडा पावसामुळे भुसभुशीत झाल्यामुळेच अरुंद पूल घाटातील अवघड वळणावर समोरील वाहनास ओलांडू पुढे जावू नये. रस्त्यावरील साईडपट्टीवर वाहन उभे करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे वाहन चालकांना दिशादर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
आगारातील सर्व बसेस दुरूस्त करा
पावसाळ्यापूर्वी आगारातील सर्व बसेसचे दुरुस्ती करावी, पावसाळ्यात बसेस गळक्या राहू नयेत यासाठी बसच्या खिडक्यांची तावदाने,काचा सुस्थितीत करावेत. या उपाययोजना केल्यास पावसाळ्यात प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. बसच्या खिडक्यांची तवदाने, काचा तुटल्याने पावसाळ्यात प्रवेश करणे अवघड होत असते. यामुळे आगारातील सर्व बसेस दुरूस्त करण्याची सूचना करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या तक्रारी येऊ देऊ नका
बसेसला असलेली छिद्रे बुजून बंद करावेत,पावसाचे पाणी आत येणार नाही याची दक्षता घ्यावी,प्रवाशांच्या तक्रारी येवू नयेत यासाठी बसेसची दुरुस्ती करावी असे आवाहनही परिवहन महामंडळातर्फे करण्यात आलेले आहे. प्रवाशांची तक्रार कमी येण्यासाठी उपायोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचे पाणी बसमध्ये येऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.