भंडारा: जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे भंडारा जिल्ह्यातील राजेदाहे गावात घर कोसळून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सकरू खंडाते, सारिका खंडाते आणि सुनक्याना खंडाते अशी त्या तिघांची नावे आहेत. दोन दिवसाच्या मुसळधार पाऊसामुळे खंडाते यांचे जुने घर कोसळले.
अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. लोकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. येत्या २४ तासांत पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.