नॉटिंगहॅम: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पावसाने खोडा घातले आहे. आज गुरुवारी भारत-न्यूझीलंड वर्ल्डकपचा सामना रंगणार आहे. मात्र पावसामुळे सामना होईल की नाही याबाबत अनिश्चितता आहे.
नॉटिंगहॅममध्ये सध्या पाऊस सुरु आहे. मात्र, दुपारच्या जेवणानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज स्थानिक हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे काही षटकांचा खेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सामना भारतासाठी अतिशय प्रतिष्ठेचा आहे. तगड्या अशा न्यूझीलंड संघाला नमविणे भारतासाठी सोप नसणार आहे. कारण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा शिखर धवन हाताच्या दुखापतीमुळे या लढतीत खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासह लोकेश राहुल सलामीला येईल. सलामीच्या जोडीवर भारतीय संघाची मदार असणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने दोन सामने जिंकले आहे, त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला आहे.