मुंबई: राज्य विधमंडळ पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ३ ऑगस्ट पासून अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला अधिवेशन घेणे शक्य नाही असे लक्षात आलं आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरवण्या मागण्यांसाठी एका दिवसाचे अधिवेशन घेण्याची शक्यता असल्याची माहिती,” मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
पावसाळी अधिवेशन फक्त चार दिवस चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन लवकरात लवकर संपवलं जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.