मुंबई : पावसाळ्याच्या ऋृतूला सुरुवात झाली असून पावसाने राज्यभरात मोठीच उसळी मारलेली दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण ऋृत्यूत पाऊस दमदार हजेरी लावण्याची चिन्हे दिसत आहेत. या पावसाळ्या दरम्यान राज्यभरातील समुद्रांच्या पातळीत बर्याच हालचाली घडणार आहे. कुठे मोठी भरती येणार तर कुठे लहान भरती येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच समुद्र किनार्याच्या परिसरात राहणार्यांनादेखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाळयाच्या चार महिन्यात तब्बल 48 वेळा 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार असल्याची हवामान खात्याने अंदाज व्यक्त केले. 25 जून रोजी सर्वात मोठी तर 28 जुलै रोजी सर्वात लहान भरती असल्याचेही मेरीटाईम दोरदाने वेळापत्रकच प्रसिद्ध करण्यात आले आहे. वेळापत्रकात दिलेल्या माहितीनुसार 4 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या असतील. रविवार 25 जून रोजी सर्वात मोठी तर शुक्रवार 28 जुलै रोजी सर्वात लहान भरती असेल. साडे चार मीटर उंचीची अधिक भरती जूनमध्ये तीन वेळा आणि जुलै मध्ये दोन वेळा असतील. ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये साडेचार मीटर पेक्षा कमी उंचीच्या लाटा येतील. रविवार 25 जून रोजी दुपारी 2.55 वा. 4.59 मीटर उंचीची सर्वात मोठी भरती असेल तर शुक्रवार 28 जुलै रोजी सायं. 5. 15 वा. सर्वात लहान म्हणजे 4 मीटर उंचीची भरती येणार आहे. जून मध्ये 24,25,26 जून रोजी सलग तीन दिवस तर जुलै मध्ये 24 व 25 जुलै रोजी सलग दोन दिवस असे एकूण पाच वेळा साडे चार मीटरपेक्षा अधिक उंचीची भरतीची लाट येणार आहे.
किनाव्याजवळ राहणार्यांना सतर्कतेचा इशारा
ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये साडे चार मीटरपेक्षा कमी उंचीची भरती असेल. शनिवार 24 जून रोजी दुपारी 2 वा. 4.51 मीटर, रविवार 25 जून रोजी 2.5क् वा. 4.59 मी. तर सोमवार 26 जून रोजी दुपारी 3.3क् वा. 4.56 मी. तसेच, सोमवार 24 जुलै रोजी दुपारी 2.3क् वा. 4.52 मी. तर मंगळवार 25 जुलै रोजी 3.15 वा. 4.51 मी. इतक्या उंचीच्या भरतीच्या लाटा येणार आहेत. भरतीच्या काळात खाडी किनारी परिसरात राहणार्या घरांत पाणी साचण्याची शक्यता असते. त्यामुळे येथील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.