मुंबई : बॉलीवूडची बार्बी डौल कतरीना कैफ पुन्हा एकदा तिच्या हॉट अंदाजात चाहत्यांना घायल करायला आली आहे. शाहरुख खान, कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा अशी तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट ‘झिरो’ २१ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटातील ‘हुस्न परचम’ गाणं रिलीझ होण्याच्या आधीच खूप चर्चेत होता. आता हे गाणं रिलीझ झालं आहे. या गाण्याला अजय-अतुलने संगितबद्ध केले आहे. तर भूमी त्रिवेदीने आपला दमदार आवाज दिला आहे. या गाण्यात कतरीनाचा वेगळा लूक आहे आणि यासोबतच तीच डान्सही खूप दमदार असल्याचे दिसून येत आहे. कतरीना नेहमी प्रमाणेच चाहत्यांच्या मनावर यावेळीही छाप सोडणार आहे.