पाहिल्यांदाच मकर संक्रांतीनिमित्त चार ठिकाणी ‘महापौर बचत बाजार’

0

पुणे : महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने महापालिकेकडून पाहिल्यांदाच मकर संक्रातीच्या निमित्ताने महापौर बचत बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुमारे साडेचार हजार बचतगट कार्यरत आहेत. वर्षातून एकदाच हा उपक्रम न ठेवता तीन ते चार वेळा तो असावा अशी मागणी केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन महापौरांनी स्वतः पुढाकार घेत यावर्षी मकरसंक्राती निमित्ताने हा बचत बाजार आयोजित केला आहे. येत्या 11 ते 13 जानेवारी दरम्यान शहराच्या चार ठिकाणी स. 11 ते रात्री 9पर्यंत हे बचत बाजार सुरू असणार आहेत. त्यात सुमारे 1 हजाराहून अधिक बचतगट सहभागी होणार आहे.

या ठिकाणी भरणार बाजार

नानासाहेब पेशवे जलाशय, कात्रज- कोंढवा रस्ता
बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर
कै. नथुजी मेंगडे, जलतरण तलाव, कर्वेनगर
प्रीमरोज मॉलच्या मागे, बाणेर गावठाण