भुसावळ- रावेर तालुक्यातील पिंपरकुंड येथील रहिवासी व रावेरच्या वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीला फुस लावून पळवत तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता तर पीडीतेला आरोपीच्या घरातून ताब्यात घेतल्यानंतर पीडीतेने आत्महत्या केली होती. या घटनेप्रकरणी सलीम इस्माईल तडवी (22) विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती. भुसावळ अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.एस.पी.डोरले यांनी सबळ पुराव्याअभावी संशयीताची निर्दोष मुक्तता केली. पाल वसतीगृहातील विद्यार्थी सलीम तडवी याने 31 डिसेंबर 2016 दुपारी दोन वाजता तरुणीस पळवून आणत पालच्या वसतिगृहावर अत्याचार केला तेथून पुन्हा पीडीतेला मोरव्हाल नेत तेथेही अत्याचार केला तर याच दिवशी पीडीतेच्या वडिलांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर दुसर्या दिवशी तिने बदनामीच्या भीतीने शेतात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी सलीम विरूध्द रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. भुसावळ न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. संशयीत आरोपीतर्फे अॅड.प्रफुल्ल आर.पाटील यांनी युक्तीवाद केला.