पिंपरीतून दहा वर्षांची मुलगी बेपत्ता

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील भाजी मंडई येथे खरेदीसाठी गेलेली 10 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाली आहे. फातिमा एजाज सय्यद (वय 10 रा. भाजी मंडई जवळ पिंपरी) असे तिचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली. याप्रकरणी तिच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आई निसारा सय्यद यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार आहे. चिमुकली फातिमा दुपारी सुमा सय्यद यांच्या दुकानात खरेदीसाठी गेली होती, मात्र ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तिला अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.