पिंपरीत इमारतीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

0
पिंपरी : राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 27) सकाळी पिंपरीगाव येथे घडली. प्रथमेश विजय अबनावे (वय 17, रा. पिंपरीगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश याने तो राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास उडी मारली. या घटनेत गंभीर झालेल्या प्रथमेश याला स्थानिक नागरिक विलास सोनावणे यांनी आपल्या वाहनातून वायसीएम रुग्णालयात नेले. तिथे उपचार सुरू असताना दुपारी त्याचा मृत्यू झाला. प्रथमेश हा डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचे वडील वारल्यापासून तो मानसिक दबावाखाली होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.