पिंपरीत कोरोना बाधितांचा आकडा 500 पार

0

पिंपरी:- देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंतेची बाब ठरत आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक ,जळगाव शहरात रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून आढळणारी रुग्णसंख्या 40 पेक्षा अधिक आहे.

22 मे रोजी पिंपरी चिंचवडला रेड झोनमधून वगळण्यात आले. त्या मुळे महानगरपालिकेने काही प्रमाणात निर्बन्ध शिथिल करून दुकाने, उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र रेड झोनमधून वगळल्यानंतर शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

गेल्या 12 दिवसात शहरात 300 नवीन रुग्ण आढळले आहे. त्यात आनंद नगर झोपडपट्टीतील 180 रुग्णांचा समावेश आहे.महात्मा फुले नगर झोपडपट्टीतही रुग्ण आढळले असून पाचशेचा आकडा पार केला आहे. शहरात 275 सक्रिय रुग्णांवर महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरातील 224 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.