पिंपरी-पिंपरी-चिंचवड मधल्या ताथवडे भागात पित्यानेच पोटच्या दोन मुलांची हत्या करून नंतर स्वतःहा आत्महत्या केली. पत्नी कामावरून घरी परतल्यानंतर हा मन सून्न करुन सोडणारा प्रकार सामोर आला. दीपक बरमनने (३५) शुभम आणि रुपम दोघांची गळा आवळून हत्या केली. शुभम १० वर्षांचा तर रुपम आठ वर्षांचा होता. दीपकने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे. घराच्या समोर असलेल्या दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पती-पत्नी नोकरीला होते. दीपकने इतके टोकाचे पाऊल का उचलले ? त्यामागे काय कारणे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.