पिंपरी चिंचवडच्या सर्व सीमा बंद

0

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड शहर ‘कंटेनमेंन्ट झोन’ घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार शहराच्या सर्व सीमा बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील १० दिवसामध्ये कोरोना कोविड -१९ रुग्णाची संख्या मोठया प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात स्थानिक प्रसार स्टेज न रहाता सामुदायिक प्रसार (Community Transfer Stage) सुरू होण्याची शक्यता असल्याने वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी शहरातील नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील संपुर्ण भाग रविवार दिनांक १९ एप्रिल २०२० रात्री १२:०० वाजले पासून कंटेनमेंन्ट झोन म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज घोषित केला.