पिंपरी-चिंचवडमध्ये अतिवृष्टीच्या इशारा

0

मुख्यालय न सोडण्याचे निर्देश- आयुक्त दिलीप गावडे

पिंपरी-चिंचवड :- पश्‍चिम महाराष्ट्रात हवामान विभागातर्फे येत्या दोन ते तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात देखील आणीबाणीची परिस्थिती उद्‌भवू शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संबंधित सर्व विभाग प्रमुखांना या काळात मुख्यालय न सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

पालिकेतर्फे पूरनियंत्रण कृती आराखडा तयार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूरनियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याअंतर्गत आरोग्य, अग्निशमन, आरोग्य, वैद्यकीय, दुरसंचार, स्थापत्य, बांधकाम परवाना, विद्युत, शिक्षण, सुरक्षा व इतर महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, त्यांचे काम व जबाबदारी यांची विभागणी करण्यात आली आहे. याशिवाय पवना धरणातील विसर्ग झालेले पाणी शहराच्या हद्दीत येण्यास लागणारा कालावधी, पूरनियंत्रण रेषेलगतच्या रहिवाशांचे स्थलांतर करण्याचा 34 शाळा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय आपत्तीच्या वेळी सर्व विभागांशी समन्वय साधण्यासाठी कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.