पिंपरी – चिंचवडमध्ये डीपीला आग; आगीत एकाचा मृत्यू

0

पिंपरी – चिंचवड : डांगे चौकाजवळ बीआरटी रोडमध्ये असलेल्या एका इलेक्ट्रिक डीपीला अचानक रविवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास आग लागली. या घटनेमध्ये एकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र ही व्यक्ती नेमकी कोण आहे? डीपीजवळ काय करत होती. ही माहिती अद्याप समजू शकलेलं नाही.

पिंपरी – चिंचवडमधील डांगे चौकाजवळ बीआरटी रोडमध्ये असलेल्या एका इलेक्ट्रिक डीपीला दुपारी अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच तात्काळ वीजपुरवठा बंद करण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच पुणे अग्निशमन विभागाने तात्काळ रहाटणी विभागाला ही माहिती कळवली. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, डीपीमध्ये एका व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून आगीचे नेमके कारण देखील अद्याप समजू शकले नाही. याबाबतची वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.