क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स, कॅरम, बुध्दीबळ, नृत्य, गायन, रांगोळी, चित्रकला, कुस्ती स्पर्धा होणार
आमदार जगताप यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
पिंपरी : भाजपातर्फे पिंपरी-चिंचवड शहरात सीएम चषक अर्थात मुख्यमंत्री करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स, 100 मीटर व 400 मीटर धावणे, कॅरम, बुध्दीबळ, नृत्य, गायन, रांगोळी, चित्रकला कुस्ती स्पर्धा होणार आहे. स्पर्धांमध्ये विद्यार्थी, खेळाडू आणि शहरवासीयांना सहभागी होता येणार आहे. भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सी.एम. चषकांतर्गत सांगवी येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघातर्फे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रहाटणी-काळेवाडीतील तापकीर नगर येथे काका होम्स सोसायटी समोरील मैदानावर शनिवारी (दि. 15) दुपारी तीन वाजता स्पर्धा होणार आहे. स्वीकृत सदस्य विनोद तापकीर यांनी संयोजन केले आहे.
हे देखील वाचा
असे आहेत स्पर्धेचे विषय
रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा रविवारी (दि. 23) होणार आहे. सकाळी आठ ते दुपारी बारा वाजतापर्यंत स्पर्धा प्रभाग स्तरावर होणार आहे. स्पर्धेसाठी रविवार (दि. 16) पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. भाजपातर्फे शहरात प्रभागनिहाय चित्राकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी 21 हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि चषक विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, जलसंवर्धन, स्वच्छ भारत अभियान, आरोग्य हीच संपत्ती, आयुष्यमान भारत योजना, मतदान माझा मुलभूत हक्क आहे. व्यक्तिचित्र-अटलजी जीवनपट, निसर्गचित्र, पिंपरी-चिंचवड माझी स्मार्ट सिटी आदी चित्रकला स्पर्धेचे विषय आहेत.
स्पर्धा सर्वांसाठी खुली
स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. कोणतेही शुल्क स्पर्धेसाठी नाही. प्रभाग क्रमांक 16, 17 आणि 18 मधील स्पर्धकांनी विभिषण चौधरी – 9763701833, प्रभाग क्रमांक 22, 27, 28 मधील स्पर्धकांनी संदीप नखाते – 9975757474, क्रमांक 23, 24, 25, 26 मधील स्पर्धकांनी संदीप गाडे – 9822350101, प्रभाग क्रमांक 29, 31, 32 मधील स्पर्धकांनी महेश जगताप – 9822660506 प्रभाग क्रमांक 9,10,21 राजू सावंत – 9822769842, वैशाली खाड्ये – 9823253564 प्रभाग क्रमांक 14,15,19 मधील स्पर्धकांनी विठ्ठल भोईर – 9890924999, प्रभाग क्रमांक 20,30 मधील स्पर्धकांनी कुणाल लांडगे – 9922270009 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आ