पिंपरी- डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या बदल्यानंतर लगेच दोन महिन्यात दोन्ही पोलीस उपायुक्तांच्या त्यांच्या पूर्वपदावर बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट कोर्ट) दिलेल्या निकालानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी बदल्यांचे आदेश गुरुवारी २८ रोजी दिले. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची मुख्यालय ते परिमंडळ दोन आणि पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांची परिमंडळ दोन ते मुख्यालय येथे बदली करण्यात आली आहे. डिसेंबर 2018 मध्ये केलेल्या बदल्याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने 6 फेब्रुवारी 2019 रोजी या बदल्या पूर्ववत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी दोन्ही पोलीस उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत.