पिंपरी-पिंपरी-चिंचवड हद्दीतील डूडूळगाव येथे इमारतीचे काम करणाऱ्या तीन कामगारांचा मालवाहू क्रेन अंगावर पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी ११.३० सुमारास घडली आहे. पांडुरंग बसप्पा चव्हाण (वय ३५), भगवान गायकवाड (वय २९) ,अमर राठोड (वय २८) अशी अपघातातील मृत कामगारांची नावे आहेत. दिघी पोलिसांत याप्रकरणाची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास डूडूळगाव येथील राधे रिगल रेसिडेन्सी येथे सहा मजली इमारतीचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक सहाव्या मजल्यावर वाळू आणि सिमेंट घेऊन जाणारी क्रेन खाली कोसळली. यात तीन कामगार गंभीर जखमी झाले. घटनेत दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.