पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे ऑडीट होणार

0

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची माहिती

पिंपरी –  नद्याचें ऑडीट करून नियोजवबद्धरीत्या कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्राद्वारे दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नद्याचे ऑडीट करण्यासाठी शहरातील तज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी आणि नगरसेवकाचें एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे. त्यामध्ये पर्यावरणप्रेमी, तज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरामधून मुळा ११ किलोमीटर, पवना २५ किलोमीटर तर इंद्रायणी २१ किलोमीटर वाहते.  महापालिकेने जलसंपदा विभागाकडून तीनही नद्यांचे सर्वेक्षण करुन पूररेषेची आखणी करुन घेतली आहे. या पूररेषेमध्ये होणारी अनधिकृत बांधकामे तसेच नदीत टाकलेल्या राडारोड्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून जलप्रवाहाचा नैसर्गिक स्त्रोत बदलला आहे. या पूररेषेमधील बांधकामांवर कायदेशीर कारवाई होणे अत्यावश्यक होते. परंतु त्यात महापालिका प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे १२ वर्षांनतर शहरवासियांना पूराचा फटका बसला आहे.

पंचवीस ते तीस वर्षापूर्वी नदीपात्र मोकळे होते तिथे शेत जमिन होती त्यामुळे त्यावेळी जरी पूर आला तरी नागरीवस्तीला बाधा पोहचत नव्हती, परंतु नंतरच्या कालखंडात मात्र नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले त्यामुळे नद्यांना थोडा जरी पूर आला तरी नदीकाठचा नागरीवस्तीचा भाग पूरग्रस्त होतो. नदीकाठच्या नागरी वस्तीमध्ये पूराचे पाणी जाऊन सुमारे ६ हजार कुटुंबावर स्थलांतराची वेळ आली होती. 

या आपत्तीचे उत्तर शोधण्यासाठी तज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी व नगरसेवकांची बैठक आयोजित केली जाणार आहे. ही बैठक लवकरच आयोजित केली जाणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.

मुंबईतील मिठी नदीची जशी अवस्था झाली आहे तशी अवस्था आपल्या नद्यांची नये म्हणून राजकारण, गट तट बाजूला ठेवून शहरातून वाहणाºया नद्यांची पाहणी करण्यात यावी. अतिक्रमणाद्वारे होणारे मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक मयुर ेकलाटे यांनी आयुक्तांकडे केली होती.