पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात डिसेंबर महिन्यात 53 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर, जानेवारी महिन्यांपासून अद्यापपर्यंत 563 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. वातावरणातील बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दर महिन्याला डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा
संसर्ग रोगांसाठी उपाययोजना…
वाढत्या अस्वच्छतेमुळे कीटकजन्य आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये 4570 तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये, 859 संशयित रुग्णांपैकी 218 रुग्ण बाधिक ठरले आहेत. शहरात विविध ठिकाणी तपासणी सुरु असून डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय सुरु आहेत. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, परिसरातील टायर, कुंड्या, पत्रे यासारख्या ठिकाणी पाणी साचल्यास आळ्या होण्याची शक्यता आहे. यामुळे, नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. डेंग्यू व मलेरिया आजार आटोक्यात आणण्यासाठी महापालिका उपाययोजना करत असल्याचे, आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.