पिंपरी-चिंचवड : शनिवारी पहाटे पिंपरी चिंचवडसह शहर परिसरात थंडीचा कडाका वाढल्यामुळे सर्वत्र दाट धुक्याची झालर पसरलेली होती. वातावरणातील बदलामुळे शहर थंडीत बुडाले होते. दाट धुक्यामुळे नागरिक वाहनांच्या लाईट सुरु ठेऊन वाहने चालवीत होते. या धुक्याने मॉर्निंग व वॉकसाठी निघालेल्यांनी सुखद अनुभव घेतला. थंडीमुळे नागरिक उबदार कपडे घालूनच बाहेर पडत होते.