पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कमिटीतर्फे होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

0

पिंपरी:पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कमिटी, पिंपळे गुरव काँग्रेस कमिटीच्यावतीने एआरएस अल्बा ३० या होमिओपॅथी औषधाचे घरोघरी वाटप करण्यात आले. कोरोनाशी लढणाऱ्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सांगवी पोलिस स्टेशन तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सौरभ शिंदे व रोहित शेळके यांनी सहभाग घेतला. कोविड-१९ ह्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बा ३० या होमिओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत आहे. स्व.राजीव गांधी प्रतिष्ठानच्यावतीने घरगुती वस्तू व धान्य दिले व आर्थिक मदत करण्यात आली. काळेवाडी फाटा येतील अशोका सोसायटी रुख्मिणी करोते व त्यांचा मुलगा उमेश करोते रहात आहे. वडील महावितरणामध्ये वाहन चालक होते, त्यांचे निधन झाले आहे, अशा अनेक कुटुंबाला लाकडाऊन चा काळात प्रतिष्ठानने मदत केली आहे .

यावेळी प्रसाद कुजीर , संदेशकुमार नवले, रोहित शेळके आणि सांगवी पोलिस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक उपस्थित होते.