पिंपरी ते निगडी मेट्रोचा डीपीआर सादर करावा; मनसेची मागणी 

0
पिंपरी चिंचवड : महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने चिंचवड येथील मदर टेरेसा उड्डाणपूल ते भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत मेट्रो मार्गाचा सविस्तर विकास प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. तो डीपीआर सर्व नगरसेवकांसमोर लवकरात लवकर सादर करावा, अशी मागणी मनसे गटनेते सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
तीन महिने उलटूनही सादरीकरण नाही…
महामेट्रोच्या वतीने स्वारगेट ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपूल मार्गापैकी शहरातील दापोडी ते उड्डाणपूलापर्यंतचे काम वेगात सुरू आहे. ते काम पूर्ण करण्यास महामेट्रोने प्राधान्य दिले आहे. तसेच, उड्डाणपूल ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकापर्यंतच्या वाढीव 4.9 किलोमीटर अंतराच्या 1 हजार 100 कोटी खर्चाचा डीपीआर महामेट्रोने तयार केला आहे. महामेट्रोचे अधिकारी आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात 25 ऑक्टोबरला बैठक झाली. त्यावेळी डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले होते. मात्र त्यास तीन महिने उलटूनही आयुक्तांनी अद्याप डीपीआरचे नगरसेवकांसमोर त्याचे सादरीकरण केले नाही. ते सादरीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी आयुक्तांना दिला आहे