पिंपरी : मागील काही दिवसांतील घटना पाहता शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी घटनांवर वचक बसावा, यासाठी पोलिसांनी पिंपरीतील नेहरुनगर, भाटनगर, मिलींदनगर परिसरात सोमवारी दुपारी रुटमार्च काढला. यामध्ये परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त सतीश पाटील, पिंपरीचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव, निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्यासह 25 कर्मचारी व दंगल नियंत्रण पथकाचे 55 जवान व अधिकारी असे सुमारे 90 कर्मचारी सहभागी झाले होते.