पिंपरी : प्रभाग क्र 19 मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शैलेश मोरे यांच्यावतीने पिंपरी येथील बौद्धनगर परिसरात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना गॅस व शेगडी देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेवक शैलेश मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सरकारच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहे. त्या योजनेचा लाभ गरीब, गरजूंना मिळवून देणार आहे. अनेक चांगल्या योजना लोकांना माहित नसतात. त्या लोकांपर्यंत या योजना पोहोचविल्या पाहिजेत. यावेळी मोफत गॅस वितरण समारंभात सुमारे 50 महिलांना मोफत गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, अखिल भारतीय दारिद्रय निर्मुलन समिती अध्यक्ष लालासाहेब गायकवाड, अखिल भारतीय दारिद्रय निर्मुलन समिती महिलाध्यक्षा वैशाली गायकवाड आदी उपस्थित होते.