पिंपरूळ फाट्यावर रस्ता लूट : भुसावळातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

फैजपूर : भुसावळ रस्त्यावरील पिंपरूळ फाट्यावर वाहने अडवून रस्ता लूट झाल्याचा प्रकार मंगळवार, 21 रोजी साडेचार वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी तिघा संशयीतांपैकी कपिल विजय खंडेराव (27, कंडारी, ता.भुसावळ) या आरोपीस अटक करण्यात आली तर अन्य दोघा पसार आरोपींचा कसून शोध सुरू आहे. दरम्यान, यावल न्यायालयात अटकेतील आरोपीला हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दगडफेकीत फुटल्या वाहनांचा काचा
तिघा आरोपींनी वाहन अडवून त्यावर दगडफेक केल्याने ट्रकच्या काचा सुद्धा फुटल्या. पोलिसांचे पथक पहाटे गस्तीवर असताना पिंपरूळ फाट्यावर रस्ता मंगेश भाट (आंदलवाडी, ता.रावेर) यांच्या ताब्यातील आयशर क्रमांक एम.एच.43 ई-7448 या वाहनाला थांबवून चालकाला मारहाण करीत त्यांच्या खिशातील 200 रुपये हिसकावण्यात आल्या तसेच उमेश चौखंडे (रुईखेडा, जि.अकोला) यांच्या ताब्यातील या वाहनाला सुद्धा अडवून चौखंडे यांच्या खिशातून 600 रुपये व दोन मोबाईल आरोपींनी हिसकावले होते. पोलिस पोहोचताच दोघा आरोपींनी पळ काढला तर कपिल विजय खंडेराव (कंडारी) याला पकडण्यात यश आले. दरम्यान जॅकी फ्रान्सिस, हेमंत तायडे हे आरोपी पसार झाले आहे तर अटकेतील आरोपी कपिल खंडेराव याच्या ताब्यातनू 400 रुपये रोख व 20 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल जपत करण्यात आली. ही कारवाई सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, फौजदार मकसूद शेख, पोलिस कॉन्स्टेबल किरण चाटे ,बाळू भोई यांच्या पथकाने केली.