खिर्डी : भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव येथे सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करीत मोजक्या वर्हाडींच्या उपस्थितीत आदर्श विवाह पार पडला. वरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कुमार बोरसे, हरिष भोय यांच्या निगराणीखाली आदर्श विवाह पार पडला. पिंपळगाव येथील उमेश हरी इंगळे यांची कन्या प्रियंका व रावेर तालुक्यातील रेंभोटा येथील दिवंगत समाधान भावडू गाढे यांचे पुत्र व साईमतचे पत्रकार कांतीलाल गाढे यांच्या पुतण्या प्रतीकचा आदर्श विवाह बौद्ध परंपरेनुसार पार पडला. लग्नविधी बौद्धाचार्य सारीपुत्र गाढे यांच्या हस्ते पार पाडण्यात आला.