पिंपळनेर । पिंपळनेर वन विभागाअंतर्गत 850 हेक्टर जंगल जळून खाक झाले असून तक्रार करुन एक महिना उलटूनही अधिकारी, कर्मचारी पहायला गेले नाही, पिंपळनेर नर्सरीत झालेल्या 75 लाखांच्या भ्रष्ट्राचाराचे पुरावे देवूनही कारवाई केली नाही, कोंडाई बारीअंतर्गत गूलतारा जंगलतोड प्रकरणाची फेर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या धूळे जिल्हा कमेटीचे जिल्हाअध्यक्ष पंडीत पाटील, जिल्हा सचिव नंदकुमार पुंडलिक तवर, सदस्य जगदीश दगाजी आहीरराव यांच्यातर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. न्याय न मिळाल्यास पूढील आमरण उपोषण आझाद मैदानावर केले जाईल, असा इशाराही त्यांच्यातर्फे देण्यात आला आहे.