अहिल्यादेवी प्रतिष्ठानतर्फे राबविला उपक्रम
सांगवी :कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानतर्फे पिंपळे गुरव येथे दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. महापालिकेच्या निळु फुले नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमास ‘ड’ प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, नगरसेविका आशा शेंडगे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, उषा मुंडे, चंदा लोखंडे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, राजेंद्र राजापुरे, सूर्यकांत गोफणे, स्वीकृत सदस्य महेश जगताप, प्रा.डॉ.आनंद धडस, अरुण पवार, प्रविण काकडे, बंडू मारकड, अभियंता विजय भोजने, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिरु व्हनमाने, मुकुंद कुचेकर, अभिमन्यु गाडेकर, बाबासाहेब चितळकर, काळुराम कवितके, कार्याध्यक्ष अजय दूधभाते, डॉ.अतुल होळकर आदींसह सर्व पदाधिकारी, सभासद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक शशिकांत कदम, राजू दुर्गे, आशा शेंडगे, राजेंद्र राजापुरे, यशोदा नाईकवडे आदींनी मनोगत व्यक्त केले. अजित चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. अजय दूधभाते यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज मारकड, अंबादास पडळकर, संतोष वाघमोडे, शंकर जानकर, बंडू लोखंडे,गिरीश देवकटे, अनिल टकले आदींसह सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.