ममता गायकवाड यांची घोषणा
सांगवी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्र 26 वाकड-पिंपळे निलखमध्ये स्थायी समिती सभापती, ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विकासकामे चालू वर्षामध्ये करण्यात येणार आहेत. यावेळी अनेक मुलभूत समस्यांवर कायमचा उपाय करण्यासाठी त्यांनी विकासकामांवर जास्त लक्ष दिलेले आहे. बुधवारी त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्र 26 वाकड-पिंपळे निलख मध्ये होऊ घातलेली अनेक विकासकामे जाहीर केली. या परिसरामध्ये प्रामुख्याने वाकड-पिंपळे निलखमध्ये पाण्याची समस्या मोठी आहे. यावर कायमचा उपाय म्हणून आता 24-7 अमृत योजने अंतर्गत संपूर्ण प्रभागात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम चालू झालेले व अनेक दिवसांपासून प्रयत्न करून लवकरच उभारत असलेली 25 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी. यामुळे वाकड-पिंपळे निलखमधील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.
रस्ते काँक्रिटीकरण करणार
वाकड-पिंपळे निलख परिसरातील रस्ते हे सिमेंट काँक्रीट करण्याचे करून अद्ययावत करणे यामध्ये मॉडेल रोड करून नागरिकांना वाहतुकीसाठी, चालण्यासाठी सुसज्ज असे सिमेंट काँक्रीटचे रस्ते लवकरच होत आहेत. यामध्ये कावेरी सब वे ते पिंक सिटी कॉर्नर पर्यंत डी. पी. रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक पर्यंत रोड रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, विशालनगर वाघजाई हॉटेल पासून ते कास्पटे चौक पर्यंत 24 मी डी पी रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, व वाकड पिंपळे निलखमधील अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रिटचे करणे आशा रस्त्यांच्या विकास या विकासकामां मार्फत हे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे असे विरंगुळा केंद्र उपलब्ध करण्यात येणार आहे. याकरता वाकडमध्ये ज्येष्ठांसाठी प्रशस्त असे विरंगुळा केंद्र या परिसरात उभारत आहे. लहान मुले व नागरिकांना वाकड-पिंपळे निलख मध्ये सुसज्ज असे लिनियर गार्डनच्या धर्तीवर वेणुनगर येथे गार्डन विकसित होत आहे. कस्पटेवस्ती येथील स्मशान भूमी विकसित करून अद्ययावत करण्यात येणार आहे यामध्ये विद्युत दाहिनी सुद्धा असणार आहे तसेच पर्यावरणपूरक व नागरिकांना धुराचा त्रास होऊ नये म्हणून योग्य टे आउटलेट्स असणार आहेत.
महिलांची गैरसोय दूर होणार
यावेळी बोलताना स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड म्हटल्या की, अशा अनेक विकासकामांमार्फत वाकड पिंपळे निलखमधील नागरिकांना दिवाळी भेट देत आहोत. यापुढेही अनेक चांगल्या प्रकारची विकासकामे या परिसरातील नागरिकांना अनुभवायला मिळतील. त्यामुळे नागरिकांना आनंदच वाटेल. सततच्या पाण्याच्या प्रश्नाने नागरिक वैतागले होते. तर आता हा प्रश्न लवकर मार्गी लागणार आहे. यामुळे महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.