उन्नती सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
सांगवी: पिंपळे सौदागर येथील उन्नती फाऊंडेशनच्यावतीने यंदा उन्नतीचा गणपती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. परिसरातील महिलांनी एकत्र येऊन हे पहिले गणपती मंडळ सुरु केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील महिलांना एकत्रित घेऊन हा महोत्सव साजरा कऱण्यात येणार आहे, अशी माहिती उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे व अध्यक्ष संजय भिसे यांनी दिली.
हे देखील वाचा
विधवा, तृतीयपंथीयांना मिळणार मान
याबाबत कुंदा भिसे म्हणाल्या की, गणेशोत्सवात प्रत्येक ठिकाणी पुढारी, नेते यांच्या हस्ते आरती कऱण्यात येते. पण जी महिला रात्रंदिवस कष्ट करीत असते. ती मात्र यापासून वंचित राहते. त्यासाठी गणेशोत्सवात आरतीचा मान हा दृष्टीहिन, दिव्यांग मुली, महिला डॉक्टर, परिचारिका, महिला पोलीस अधिकारी, विधवा, महिला सफाई कामगार, गृहनिर्माण सोसायट्यांमधील महिला अध्यक्षा, तृतीयपंथी यांना असणार आहे. हा महोत्सव सात दिवस चालणार असून या सात दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे.