A young man’s mobile phone was stolen from the market in Pimprala जळगाव : पिंप्राळा गावातील आठवडे बाजारातून तरुणाचा 23 हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी सोमवार., 12 सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांचा शोध
हेमंत मधुकर पवार (37, रा.आप्पा नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास ऊसूनप बुधवारच्या आठवडे बाजारात ते सायंकाळी सात वाजता भाजीपाला घेण्यासाठी गेले असता त्यांच्या खिश्यातील 23 हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानेर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील करीत आहे.