जळगाव : पोलिसांच्या अस्तित्वालाच जळगावात चोरट्यांनी आव्हान दिले असून दर दिवशी होणार्या दुचाकी चोरीमुळे वाहनधारक धास्तावले आहेत. पिंप्राळा परीसरातून एकाची घरासमोरून दुचाकी लांबवल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
घरासमोरून लांबवली दुचाकी
प्रदीप शांतीलाल कदवाने (58, सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा रोड, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरुवर, 26 मे रोजी सकाळी 11 वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एम.एच. 19 बी.ई.1872) घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने नऊ हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याचा प्रकार शुक्रवार, 27 मे रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उघडकीला आला. प्रदीप कदवाने यांनी रविवार, 29 मे रोजी सकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.