पिंप्री खुर्दला मोबाईल दुकान फोडले

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह डीव्हआर लांबवला : धरणगाव पोललिसात गुन्हा दाखल

धरणगाव : तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील मोबाईल दुकान फोडून ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि डीव्हिआर चोरट्यांनी लांबवल्याने व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

व्यापारी धास्तावले
किशोर परमानंद खामनेकर (50, रा. गुरूकुल कॉलनी, एरंडोल) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे आर्यन मोबाईल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिक दुकान आहे. मंगळवार, 16 नोव्हेंबर रेाजी रात्री 7 वाजेच्या सुमारास दुकान बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानातील ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि डीव्हिआर चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी किशोर खामणेकर यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार राजेंद्र कोळी करीत आहे.