पिकअपने दुचाकीला उडवल्याने दोघे तरुण जखमी

भुसावळ : भरधाव पिकअपने दुचाकीला उडवल्याने शहरातील दोघे तरुण जखमी झाले. हा अपघात शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल मधुमंदाजवळ बुधवार, 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.

अज्ञात पिकअप चालकाविरोधात गुन्हा
फिर्यादी सुमेध विजय गवई (26, ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ) व त्यांचा मित्र गणेश विनायक इंगळे (हुडको कॉल्नी, भुसावळ) हे दुचाकीने जात असताना पांढर्‍या रंगाची पिकअप धडक दिल्याने दोन्ही मित्र जखमी झाले. रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर गवई यांनी शुक्रवारी तक्रार दिल्यानंतर अज्ञात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.