नंदुरबार : 2018 च्या खरीप हंगामात अवर्षणाचा फटका बसलेल्या केवळ तीन हजार शेतकर्यांना शासनाने पीक विमा मंजूर केला आह़े 10 हजार शेतकरी विम्याच्या परताव्यासाठी पात्र असतानाही केवळ तीनच हजार शेतक:यांच्या खात्यावर रक्कम आल्याने ग्रामीण भागात निराशा व्यक्त करण्यात आली़ 2018 च्या खरीप हंगामात पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली होती़ पीककर्ज घेतांना बँकांकडून सक्तीने वसुली होणार्या विम्याच्या रकमेस शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता होती. कृषी विभागाने जानेवारी अखेरीस पूर्ण केलेल्या पीक कापणी प्रयोगामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
नंदुरबार जिल्ह्यात अडीच लाख टन चार्याची कमी
येत्या महिनाभरात जिल्ह्यात चारा टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस लांबल्यास त्याची भिषणता आणखी वाढणार आहे. जिल्ह्याला लागणार्या चार्यापैकी सद्यस्थितीत दोन लाख 65 हजार मे.टन चार्याची कमतरता आहे. दरम्यान, अनेक गावांमधून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पुढे येवू लागली असली तरी प्रशासन अद्याप त्याबाबत गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली चारा छावणीची मागणी प्रशासनाने पूर्ण केली असती तर आज अनेक शेतकर्यांवर गुरे विकण्याची वेळ आली नसती.