पिण्याच्या पाणी टंचाईसाठी फागणे व २१ गावे योजना पुन्हा सुरु करा

0

निवेदनाव्दारे पाणी पुरवठामंत्री व पालकमंत्र्यांकडे माजी आमदार शरद पाटीलांची मागणी

धुळे । यंदा धुळे तालुक्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे फागणे, बाळापूर गावापासून पुर्वपट्ट्यातील सर्वच गावे तसेच आर्वी व शिरुड परिसरातील ४० गावांमधे भीषण पण्याट्या पाण्याची टंचाई आहे. या पार्श्‍वभुमीवर युती सरकारच्या काळात जीवन प्राधिकरण योजनेच्या माध्यमातून फागण्यासह २१ गावांसाठी सुरु करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरु करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे रांना धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी नुकतेच मुंबई येथे दिले.

दुरूस्तीअभावी तसेच थकीत खर्चाअभावी ४ ते ५ वर्षापासून योजना बंद
धुळे तालुक्याच्या पुर्वपट्ट्यातील २१ गावांसाठी युती सरकारच्या काळात जळगांव जिल्ह्यातील पारोळा तालुक्रातील तामसवाडी धरणावरुन २१ गाव पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली होती. सदर योजना ही दुष्काळ व संकंट काळात आजही उपयुक्त ठरत आहे. तामसवाडी धरणात २१ गाव पाणीपुरवठा रोजनेसाठी ७० दलघफूपेक्षा जास्त पाण्राचे आरक्षण आजही कारम आहे. सदर २१ गांव पाणी पुरवठा रोजना वीजबील, देखभाल दुरुस्तीच्या थकीत खर्चा अभावी गेल्या ४ ते ५ वर्षापासून बंद आहे. रा रोजनेसाठी सुरु असलेले प्रोत्साहन अनुदान बंद झाले आहे. विविध गावांसाठी असणार्‍रा प्रादेशीक पाणीपुरवठा रोजना दुष्काळाच्या पार्श्‍वभुमीवर सुरु करण्यासाठी पालकमंत्र्यांनी शासनस्तरावर मंत्रालरात बैठक बोलवून जिल्हाधिकारी, मुख्र कार्रकारी अधिकारी, जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, कार्रकारी अभिरंता,पाणीपुरवठा विभाग,जि.प.धुळे, यांच्यासह संबंधित अधिकार्‍रांची पाणीपुरवठा मंत्र्यांच्या दालनात बैठक बोलावावी, अशी मागणी माजी आ.प्रा.पाटील रांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.

पाळीव जनावरांचे स्थलांतर
या हंगामात धुळे तालुक्यात ७५ टक्केगावे दुष्काळाच्या छायेत आहेत. पुरेसा पाऊस न पडल्रामुळे गावांना पाणी पुरवठा करणार्‍रा विहीरी व नद्या, नाले, धरणे कोरडीच आहेत. त्या मुळे बोरी परिसरात व धुळ्याच्या पूर्वपट्टरात फागणे, वरखेडे, बाळापूर, अजंग, मुकटी, अंबोडे, सावळी, चिंचखेडा, नंदाळे, अमदड, काळखेडे, भिरडाई, भिरडाणे रा परिसरांमधे दिवाळीपासूनच ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे. तसेच शेतकर्‍रांकडील पाळीव जनावरांना सुध्दा पिण्राच्रा पाण्रासाठी स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे पारोळा तालुक्यातील तामसवाडी धरणावरील जुनी फागणे २१ गांवे पाणी पुरवठा रोजना पुन्हा सुरु करणे आवश्रक आहे. यासाठी माजी आ. प्रा.शरद पाटील यांनी निवेदन सादर केले आहे.