शेणवा । आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत येणार्या शासकीय आदिवासी आश्रमशाळातील मंजूर असणार्या मुलामुलींच्या वसतिगृह इमारत, मुख्य आश्रमशाळा इमारत, संरक्षण भिंत व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ही कामे आजही काही आश्रमशाळेंची अपूर्णच असूनही इमारत बांधकामे कित्येक वर्षे पूर्ण न झाल्याने किंवा इमारतच नसल्याने कोठारे व टाकीपठार येथील आदिवासी विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील अती दुर्गम भागातील आश्रमशाळा समजल्या जाणार्या कोठारे आश्रमशाळेतील विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र येथील काही विद्यार्थी हुशार असून त्यांनी अनेक कार्यक्रमांध्ये आपली हुशारी दाखवली आहे. येथे एकूण 274 मुले शिकत असून 169 मुले, तर 115 मुली शिक्षण घेत आहेत मुख्य म्हणजे येथे कुठल्याच प्रकारची इमारत नसून भाड्याच्या घराघरांत कोडावड्यासारखे मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. याठिकाणी एकून 27 पदे मंजूर असुन 7 पदे रिक्त आहेत. मुलांना पिण्यासाठी चक्क बैलगाडीने पाणी आणावे लागत असून शौचालयांची पण अवस्था चांगली नाही. एकीकडे आदिवासी मुलांना शिक्षणासाठी भौतिक सुविधा देण्यासाठी आदिवासी विकास प्रशासन करोडो रुपये खर्च करत असून, या इमारत बांधकामासाठी बांधकाम विभागाकडे निधी वर्ग करते. मात्र, ठेकेदारांच्या अनास्थेमुळे ही कामे अपूर्ण राहत आहेत. सदर कामाची चौकशी करून त्वरित पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी यापूर्वी केली होती.
आयुक्तांकडे 11 ठिकाणी नवीन इमारती व तीन वसतिगृहांची मागणी
शहापूर तालुक्यातील काही आदिवासी आश्रमशाळामधील इमारत बांधकामे झाली असली, तरी ती बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. सदर इमारत बांधकामे करणारे ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करणे गरजेचे असून दुर्लक्ष करणार्या अधिकार्यावर त्वरित कारवाईचा दांडगा उचलणेदेखील गरजेचे असल्याचे विद्यार्थी पालक म्हणत आहेत करून अपूर्ण कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. दरम्यान, आता ठीक आहे. परंतु पावसाळ्यात शाळेची कामे अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत असतो. शहापूर प्रकल्पांतर्गत येणार्या शासकीय आश्रम शाळांची पाहणी मी केली असता प्रकर्षाने चांगल्या इमारतीअभावी विद्यार्थी शिक्षण घेत असून मी आत्ताच अप्पर आयुक्तांकडे 11 ठिकाणी नवीन इमारती व तीन वसतिगृहांची मागणी केली आहे.