पिपल्स बँकेवर न्रमता पॅनलचे वर्चस्व

0

पाचोरा : पाचोरा तालुक्यासह पंचक्रोशीतील व्यापारी व जनसामान्यांचे आर्थिक केंद्रबिंदु असलेल्या दि पाचोरा पीपल्स को- ऑप बॅक लि. च्या चुरशीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान संचालक अशोक संघवी यांच्या नेतृत्वाला सभासदांनी पुन्हा विश्वास ठेवून 12 सभासद निवडून दिले तर विरोधात उभ्या असलेल्या सहकार पॅनलला 3 जागारांवर समाधान मानावे लागले. या निवडीसाठी आजी- माजी आमदारांनी सहकारातून परीवर्तन हाटुवण्यासाठी मतदारांना हाक दिली होती परंतु मतदारांनी एकतर्फी सत्ता ही पुन्हा अशोक संघवींकडे सोपवली. या निवडणुकीत अशोक संघवी यांच्यासोबतच युवानेते अमोल शिंदे, भाजपा, काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांची भूमिका ‘किंगमेकर’ राहिली. आज सकाळी 15 जागांसाठीच्या मतमोजणीस भडगाव रोडवरील महालपुरे मंगल कार्यालयात 8 वाजता सुरुवात करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी अशोक बागल यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डी.व्ही. पाटील, दिपक पाटील, आर.एस. पाटील यांनी नियोजन केले.

मतदार संघात एकुण15659 मतदान; 275 मतदान बाद
70 कर्मचार्‍यांनी 26 टेबलांवर मतमोजणीला सुरुवात केली यात प्रथम 1 ते 20 टेबलांवर जनरलच्या 10 जागांची मतमोजणी झाली 21 ते 26 टेबलांवर महिला राखिव जागांची मतमोजणी झाली यात सहकार पॅनलच्या दोन्ही महिलांनी बाजी मारली. मयुरी बिल्दीकर (4048) यांनी पहिल्या पसंतीची तर कल्पना पाटील (4029) यांना दुसर्‍या नंबरच्या पसंतीची मते मिळाली. या मतदार संघात 15659 मतदान झाले. त्यापैकी 275 मतदान बाद झाले. इतर मागासवर्गीय मतदार संघात 8365 मतदान झाले. त्यापैकी 303 मतदान अवैध झाले यात शांताराम पाटील यांना 202 मतांना नम्रता पॅनलचे प्रा. भागवत महालपुरे यांनी पराभव केले. विमुक्त जाती भटक्या जमातीच्या एका जागेसाठी 8341 मतदान झाले त्यापैकी 329 मते बाद झाली यात नम्रता पॅनलचे विकास वाघ यांनी मनोज राउळ यांचा 1005 मतांनी पराभव केला. अनुसूचीत जाती- जमाती मतदार संघात 8253 मतदान झाले. त्यात नगराध्यक्ष संजय गोहील यांना अ‍ॅड. अविनाश भालेराव यांनी 86 मतांनी पराभूत केले. जनरलच्या 10 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात होते. या मतदार संघात 76350 मतदान झाले. त्यात 602 मते बाद झाली यात 1 ते 9 जागेवर नम्रता पॅनलचे उमेदवार निवडून आले तर 10 व्या जागेसाठी डॉ. जयवंत पाटील व पारस ललवाणी यांच्या मतांची फेरमोजणी करण्यात आली. ते 8 मतांनी निवडून आले. जनरल 10 जागांमध्ये अशोक संघवी (4498), अमोल शिंदे (4522), चंद्रकांत लोढाया (4383), राजेंद्र भोसले (4276), अल्पेश संघवी (4079), जितेंद्रकुमार जैन (4047), प्रकाश पाटील (4035), किशोर शिरूडे (3929), राजमल अग्रवाल (3929) तर जयवंत पाटील (3872) अशी उमेदवार निवडून आले. यात अतुल संघवी, प्रशांत अग्रवाल, सुभाष नावरकर, सुरेंद्र बोहरा, सतिष चौधरी, सचिन जैन यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

पोलिसांचा होता बंदोबस्त
पाचोरा पालिकेचा निवडणुकीत शिवसेनेतर्फे संजय नाथलाल गोहिल व जनाधार विकास आघाडीतर्फे अ‍ॅड. अविनाश भालेराव यांच्या लढत होवून संजय मोहिल यांचा विजय झाला होता. दरम्यान पिपल्स बँकेच्या निवडणुकीत अनुसुचित जाती जमाती मतदार संघात अ‍ॅड. अविनाश भालेराव व नगराध्यक्ष संजय गोहील यांच्यात सरळ लढत होवून भालेराव यांना 4134 तर संजय गोहिल यांच्यात सरळ लढत होवून भालेराव यांना 4048 मते मिळाली. यात भालेराव यांनी 86 जादा घेवून गोहील यांचा पराभव केला. दरम्यान पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला. सत्ताधारी नम्रता पॅनल समोर सहकार पॅनलने उभे केलेले कडवे आवाहन हे आज मतांमुळे समोर आले असून जनरलच्या 10 जागांसाठीच्या साधारण मतांचा फरक हा 500 ते 600 चा असून येणार्‍या काळात हा पहिल्या विरोधी प्रयत्न बदल घडवणारा राहिल.