पिराचे बोरखेडा येथे बिबट्याचा वावर निष्पन्न : दोन गायींचा पाडला फडशा

0

वनविभाग घटनास्थळी दाखल : गोंगाट करीत करावा वावर वनाधिकारी संजय मोरे यांचे आवाहन

चाळीसगाव – तालुक्यातील वाघळी गावाच्या पुढे असलेल्या पिराचे बोरखेडे शिवारात गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रभाकर पाटील यांच्या शेतातील पारडू तर शनिवारी सुभाष पाटील यांच्या शेतात गायी वर बिबट्याने हल्ला करीत दोघांना ठार केले होते. रविवारी घटनास्थळी वनविभागाने धाव घेत परीसर पिंजून काढला. बिबट्याच्या पायांचे ठसे मिळून आल्याने बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बिबट्याला पकडण्याची परवानगी मागितली
बोरखेडा पिराचे परीसरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन गायींचा हिंस्त्र पशूने हल्ला करीत ठार केले होते यामुळे शेतीच्या कामात मग्न असलेल्या शेतकरी वर्गात घबराट पसरली होती. वनपरीक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी आपल्या सहकारी वनरक्षक अजय हिरे, माया परदेशी, संजय जाधव, प्रकाश पाटील, वनपाल प्रकाश देवरे यांच्या सह हा परिसर पिंजून काढला बिबट्याच्या पगमार्क मिळून आल्याने गायींवर हल्ला बिबट्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे पगमार्क आधारावर हा प्राणी अल्पवयीन बिबटया असल्याचा कयास वनविभागाने वर्तविला असून त्याला जेरबंद करण्यासाठी नागपूर कार्यालयात परवानगी मागितली आहे तोवर परिसरातील शेतकर्‍यांनी शेतात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे तसेच या भागात पत्रके वाटून जनजागृती केली आहे.

तालुक्यात पुन्हा पसरली बिबट्याची दहशत
बिबट्याने गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वी वरखेडे परीसरात धुमाकूळ घातला होता. एका मागे एक सात जणांचे बळी घेत हैदोस घातला होता. अखेर या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी मोठी कसरत वनविभागाला करावी लागली होती. सुदैवाने या बिबट्याने अजूनही मनुष्यप्राणी यांच्या वर हल्ला केलेला नाही त्यामुळे हा बिबटया नरभक्षक होण्याची घटना घडण्या अगोदर त्याला पिंजरा लावून जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.