पिशवीला ब्लेड मारून लाखोंची रोकड लांबवणारे युपीतील ठग जाळ्यात
जिल्हा पेठ हद्दीतील गुन्ह्याची कबुली : अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
जळगाव : बँकेसह पोस्टात आलेल्या वयोवृद्धांना टार्गेट करीत त्यांच्याकडील पिशवीतील रोकड ब्लेडने अलगद लांबवणार्या युपीतील दोघा भामट्यांना जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी जिल्हा पेठ हद्दीतील पांडे चौकातील पोस्ट ऑफीस कार्यालयातून वृध्दाची पिशवी नेल्याची कबुली दिली असून आणखी काही चोर्या उघडकीय येण्याची शक्यता आहे. अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (58, जलालनगर, ता.सदर, जि.शहाँजहापुर, उत्तरप्रदेश) आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (66, रा.बरेली, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील भामट्यांची नावे आहेत.
एक लाखांची लांबवली होती रोकड
मजूरी काम करणारे रामेश्वर कॉलनीत राहणारे देवराम बाबुराव चौधरी (72) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते आहे. पोस्टाच्या खात्यात त्यांनी दीड लाख रूपयांची बचत केली होती. गुरुवार, 2 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नातवासोबत जळगाव शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात आले असता नातवाने भरणा स्लीप भरली आणि आजोबांनी पोस्टाच्या खात्यातून 1 लाख रूपये काढले. पैसे मोजून झाल्यानंतर त्यांनी पैसे सोबतच्या पिशवीत ठेवले आणि ते इतर बँकेत जाण्यासाठी निघाले. त्यावेळी अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (58, जलालनगर, ता.सदर, जि.शहाँजहापुर, उत्तर प्रदेश) आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (66, बरेली, उत्तरप्रदेश) दोघांनी ब्लेडच्या मदतीने पिशवीलाा 1 लाख रूपयांची रोकड लांबविली होती. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी ट्रेस
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साबळे यांनी साध्या वेशात गस्तीवर असतांना सीसीटीव्हीच्या आधारे पोस्ट ऑफीस कार्यालयाच्या परीसरात संशयास्पद फिरतांना आढळून आले. त्यानुसार जिल्हापेठ पोलिांनी सापळा रचून दोघांना अटक केली. दोघांना खाक्या दाखविताच अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, एपीआय राजेंद्र पवार, उपनिरीक्षक गणेश देशमुख, हवालदार सलीम तडवी, जुबेर तडवी, अमितकुमार मराठे, रवींद्र साबळे यांनी आरोपींना अटक केली.