भुसावळ : तरुणीचा आपल्यासोबत विवाह करावा अन्यथा घरातील सदस्यांना गोळी मारून ठार करू, अशी पिस्टल व चाकूच्या धाकावर धमकी देत एका कुटुंबाच्या घरावर दगडफेक करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी संशयीत आरोपी आशीक असलम बेग उर्फ बाबा काल्या (अयान कॉलनी, भुसावळ) व अन्य 20 वर्षीय अनोळखीविरोधात भुसावळ बाजारपेठ पेालिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिस्टलाच्या धाकावर बाबा काल्याची दहशत
पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार बाबा काल्यासह अन्य 20 वर्षीय अनोळखीने खडका रोडवरील पटेल कॉलनी परीसरात 19 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास पिस्टल व चाकूचा धाक दाखवत एका कुटुंबाच्या घरावर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. कुटुंबातील 19 वर्षीय तरुणीचे आपल्यासोबत विवाह करावा अन्यथा कुटुंबातील सर्व सदस्यांना गोळी मारेल, अशी संशयीत वारंवार धमकी देत असल्याने कुटुंब प्रचंड भेदरले होते. यावेळी बाजारपेठ पोलिसांना फोन करून माहिती कळवण्यात आली व ही बाब संशयीतास कळताच तो घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, तक्रारदार कुटुंबातील 19 वर्षीय तरुणीचा 2 एप्रिल 2020 रोजी विवाह निश्चित झाला होता मात्र जळगाव येथील वर मुलास संशयीत बाबा काल्याने तरुणीशी विवाह केल्यास जीवे ठार मार मारेल, अशी धमकी दिल्याने विवाह तुटल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.