भोसरी : बेकायदेशीररित्या पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून एक पिस्तूल, चार जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.2) मोशी टोलनाका येथे केली. मोहन सुभाष कोळी (वय 21, रा. माणिक चौक, चाकण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस शुक्रवारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी मोहन हा मोशी टोल नाका येथे बेकायदेशीररित्या पिस्तुल विक्री करण्यासाठी आल्या असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ पोटे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केले. ही कारवाई तपास पथकातील फौजदार रावसाहेब बांबळे, श्रीकांत शेडगे, पोलीस हवालदार रविंद्र तिटकारे, संदीप भोसले, पोलीस नाईक किरण काटकर यांच्या पथकाने केली.