भुसावळ । पीआरपीतर्फे शेतकर्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी 13 रोजी करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आले. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी डिआरएम यादव यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी सोमवार 12 रोजी डीआरएम यादव यांची भेट घेवून रेलरोको आंदोलनाला स्थगितीसह स्थानिक मुद्यांवर चर्चा करुन रेल्वे रुग्णालय परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण करणे तसेच रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, ठेकेदारी पध्दत बंद करुन कर्मचार्यांना काम देणे अशा अनेक विषयांवर चर्चा केली.
बैठकीस यांची होती उपस्थिती
तसेच रेलरोको आंदोलन थांबवून प्रांत कार्यालयावर शेतकर्यांच्या विषयाला घेवून 11 वाजेच्या सुमारास निदर्शने करण्यात येईल, अशी माहिती पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी दिली. याप्रसंगी महाराष्ट्र युवा अध्यक्ष राकेश बग्गन, जिल्हा महामंत्री बबलू सिद्दीकी, महिला अध्यक्ष संगिता ब्राह्मणे उपस्थित होते.