पीएमआरडीए चार कचरा प्रकल्प उभारणार

0

पुणे : पुणे शहरात रस्ते, वाहतूककोंडीबरोबरच कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. याबाबत येत्या काही काळात उपाययोजना करणे गरजेचे आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने पुणे शहराच्या चारही बाजूला चार कचरा प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागा प्रामुख्याने या प्रकल्पासाठी आपण घेण्याचा विचार करीत असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.