पुणे : महापालिकेच्या कर्मचार्यांना मिळणार्या वैद्यकीय अंशदायी योजनेचा लाभ आता पीएमपीएमएलच्या तब्बल 11 हजार कर्मचार्यांना मिळणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला होता. त्याला मंगळवारी बैठकीत मजुरी देण्यात आली.
2016पासून वैद्यकीय अंशदायी योजनेचा लाभ पीएमपीएमएल कर्मचार्यांना येत होता मात्र, 31 मार्चला या योजनेची मुदत संपल्याने आरोग्य विभागाकडून ही सुविधा थांबविली होती. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रशासनाकडून स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता त्या मंजुरी देण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतर या कर्मचार्यांची वैद्यकीय सेवा अडचणीत आली होती. त्यामुळे हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता त्याला मंजुरी मिळाल्याने आता पीएमपीएमएल कर्मचार्यांची वैद्यकीय सेवा पूर्ववत होणार आहे. या योजनेसाठी महापालिका पीएमपीएमएलकडून सुमारे 6 कोटी रूपये शुल्क घेणार आहे तसे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेच्या कर्मचार्याने प्रमाणे पीएमपीएमएल कर्मचार्यांना देखील 90 टक्के खर्च पीएमपीचा तर 10 टक्के कर्मचार्याचा (90 :10) या धर्तीवर 2016-17 पासून आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. पीएमपी आणि कर्मचार्यांकडून त्यासाठीचा हिस्सा जमा केला जातो.