पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ( पीएमपी ) च्या ताफ्यात येत्या महिनाभरात २५ ई -बस दाखल होणार आहेत . पीएमपीचे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार २६ जानेवारीपूर्वी २५ ई -बस भाडेतत्त्वावर घेतल्या जातील. त्याकरिता निविदा मंजूर झाल्या असून आदेश देण्यात आले आहेत .एप्रिल महिन्यापर्यंत आणखी १२५ ई् -बस खरेदी केल्या जातील. सध्याच्याच दरांमध्ये वातानुकुलीत बससेवा देण्यात येईल.
हे देखील वाचा
पीएमपी एकूण ५००ई -बस खरेदी करणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील २५ बस बीआरटी मार्गावर धावतील. ई बसच्या चार्जिंगसाठी वीजपुरवठा करण्याची जबाबदारी पीएमपीची असणार आहे. राज्य सरकार धोरण आखणार असल्याने चार्जिंगचा खर्च कमी होईल , असे शिरोळे यांनी सांगितले. ई बस खरेदीमुळे पीएमपीला तोटा होईल असा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप शिरोळे यांनी फेटाळला.बदलत्या काळात क्लीन एनर्जी विचार करता ई बसची आवश्यकता असल्याचा दावा शिरोळे यांनी केला.