पीएमपी प्रवासी मंचतर्फे मेळाव्याचे आयोजन

0

पुणे :- ‘पीएमपी व पोलीस प्रशासनाची संवेदनशीलता’ या विषयावर पीएमपी प्रवासी मंचतर्फे शनिवारी (दि. 19) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात चर्चा होणार आहे. सायंकाळी 5 वाजता म्हात्रे पुलाजवळील इंद्रधनुष्य सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी मध्यरात्री पीएमपीचे चालक आणि वाहक व पोलीस प्रशासनाकडून हणमंत पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची अडवणूक आणि छळवणूक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे.

प्रवासी मेळ्याव्याला पीएमपीएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, पीएमपीएलचे महाव्यवस्थापक विलास बांदल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, पीएमपी प्रवासी हणमंत पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी पीएमपीकडे सर्वाधिक तक्रारी नोंदविणा-यांचा मोफत पास देऊन सन्मान करण्यात येणार आहे. प्रवाशांनी आपल्या सूचना आणि तक्रारी मेळाव्यात मांडून पीएमपी सक्षम करण्याकरिता पुढे यायला हवे. पीएमपी प्रवासी मंचातर्फे आयोजित मोफत पास योजना व उपक्रमात सहभागी होण्यासाठी ९८५०९५८१८९, ९४२२०१७१५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंचातर्फे करण्यात आले आहे.